Maharashtra HSC Result 2024 : महाराष्ट्राच्या लाखो विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षा संपणार आहेत! महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षा मंडळाची (MSBSHSE) बहुप्रतिक्षित घोषणा! महाराष्ट्र HSC परीक्षा २०२४ चा निकाल २१ मे २०२४ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होणार आहे.
१२वी ची परीक्षा दिली आहेत? तर मग हा ब्लॉग तुमच्यासाठीच आहे! या ब्लॉगमध्ये तुम्हाला तुमचा निकाल ऑनलाईन कसा पाहता येतो, कोणत्या वेबसाइटवर तपासायचं आणि काय माहिती तयारी ठेवायची याबद्दल सविस्तर माहिती मिळणार आहे.
How to check Maharashtra HSC Result 2024 (Process)
- अधिकृत HSC निकाल पोर्टलला भेट द्या: सुरुवातीला, तुम्हाला @mahresult.nic.in या अधिकृत HSC निकाल पोर्टलवर जावे लागेल.
- Maha HSC Result 2024 विभागात जा: वेबसाइटवर गेल्यानंतर, तुमच्या समोर साइटचे डॅशबोर्ड खुले होईल. तेथे तुम्हाला “Maha HSC Result 2024” या विभागात जायचे आहे.
- आवश्यक माहिती प्रविष्ट करा: यानंतर, तुम्हाला तुमचा HSC 12वी बोर्ड परीक्षा पेपर सीट नंबर आणि तुमच्या आईचे नाव टाकायचे आहे. लक्षात ठेवा की सीट नंबर आणि आईचे नाव यांची स्पेलिंग अगदी अचूक असावी. स्पेलिंगमध्ये चूक झाल्यास तुम्ही तुमचा 12वीचा निकाल पाहू शकणार नाही.
- Submit करा: सीट नंबर आणि आईचे नाव योग्यरित्या टाकल्यानंतर तुम्हाला “Submit” बटणावर क्लिक करायचे आहे.
- तुमचा निकाल पहा: अशा प्रकारे तुमच्या समोर तुमचा 12वीचा HSC बोर्ड 2024 निकाल प्रदर्शित होईल.
Maharashtra HSC Result 2024 Link (Official Websites)
महाराष्ट्र शिक्षण मंडळ द्वारे एकूण 6 वेबसाईट जारी केल्या आहेत, ज्यावर विद्यार्थी बारावीचा निकाल पाहू शकतात. यातील काही साईट या मीडिया Education Sector मधील कंपन्यांची आहेत, तर काही Goverment च्या Official Website आहेत.